काळ आला होता, पण...!



काळ आला होता, पण...!  चांगल्या कर्माचे फळ चांगलेच भेटते! गटाराचे झाकण लावायला गेला अन चमत्कार झाला, दोन सेकंदांतच...

प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस आपल्या कर्माचं फळ निश्चित मिळतच, आणि एका तरुणांबरोबर असाच काहीस घडलं आहे, ज्याचा व्हिडिओ आता सगळीकडेच व्हायरल होत आहे. 

'काळ आता होता पण वेळ नाही' याचा अर्थ असा होतो कि, आपल्यावर एखादी वाईट किंवा धोकादायक गोष्ट घडण्याची वेळ जवळ आली होती, पण ती वेळ आणि घटना टाळण्यात आली किंवा आपला त्यातून पूर्णपणे बचाव झाला.

बऱ्याच वेळा असं होत कि चांगले कर्म करूनही आपल्याला वाईट अनुभव येतात. मग असं वाटत कि हि दुनियादारीच नको आणि आपला चंगले कर्म करण्यावरून विश्वासच उडून जातो. मात्र हीच ती वेळ असते , जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक राहून जगण्याची.

                                     येथे पहा हा व्हायरल व्हिडिओ: 

'कर भाला तो हो भला' अशी आपल्याला शिकवणच दिली जाते. शिकवण नव्हे तर हा संस्कारच आहे. यापुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण तर सांगतात, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन | मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि | तुम्ही नेहमी चांगलेच काम करत रहा, फळाची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या कामाची नोंद स्वर्गात देव देवता घेत आहेत. ते योग्य वेळ आल्यावर योग्य फळ तुम्हाला नक्कीच देतील. तोपर्यंत तुम्ही तुमचे चांगले कर्म करतच रहा. परंतु बऱ्याच वेळा आपल्याला चांगले कर्म करूनही वाईट अनुभव येतात. मग हि दुनियादारी आपल्याला नकोशी वाटते आणि सत्कर्मावरून आपला विश्वासच उडून जातो. आपण जर स्वतःची फसवणूक केली, आपल्या कामाशी इमानदारी नाही ठेवली, तर त्याचे फळ आपल्यालाच भोगावे लागणार म्हणून प्रत्येक काम इमानदारीने आणि स्वतःशी प्रामाणिक राहून केले पाहिजे, त्याचे फळ आज ना उद्या मिळाल्यावाचून राहणार नाही. 

चांगल्या कर्माचे फळ चांगलेच, काम करा फळाची इच्छा करू नका, जसे करावे तसे भरावे, जे देऊ तेच वाढवून मिळते, जे पेराल तेच उगवेल, अश्या म्हणी तुम्ही बरयाचदा ऐकल्या असतील. हाच कर्म सिद्धांताचा आधार या म्हणीद्वारे व्यक्त होतो. प्रत्येक मनुष्याला एक ना एक दिवस कर्माचं फळ मिळत. असं अनेकदा म्हटलं जात. मनुष्य हा या पृथ्वीवर चांगली आणि वाईट दोन्ही कर्म करतो. चांगले कर्म केल्यानं आपल्याला चांगलं फळ मिळत आणि आपल्याला वाईट कर्माची फळ आपल्यालाच भोगावी लागतात. कधी कधी आपल्याला कर्माची फळ उशिरा तर कधी कधी लवकर मिळतात. तसेच कर्माबाबत इंटरनेटवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक चांगल्या कर्माची प्रचिती देणारा व्हिडिओ सध्या  सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ.

                                     येथे पहा हा व्हायरल व्हिडिओ: 

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं?

आपण रस्त्यावरून चालत असताना अनेकदा पाहिलं असेल कि, रस्त्यावर मॅनहोल्स असतात, त्याला आपण गटाराचे झाकण असं म्हणतो. रस्त्यावरील गटारांची हि झाकण नेहमी सुरक्षा आणि सार्वजनिक सुविधांच्या देखभालींसाठी आवश्यक असतात. त्यामुळे लोक आणि प्राणी नकळत खाली गटारात पडण्यापासून वाचतात.

सध्या सगळीकडे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी रस्त्याच्या मधील गटाराचे झाकण व्यवस्थित बसवलेले नसल्याचे दिसून येत आहे एक माणूस त्याच्या स्कूटरवरून येताना दिसतो. तो मॅनहोल्स जवळ पोहचताच त्याला ते झाकण उघडे असल्याचे दिसते. त्यामुळे तो लगेच स्कूटर थांबवतो. त्यानंतर तो आपली स्कूटर बाजूला घेऊन तातडीने तिथून निघून जातो. पण, तिथेच रस्त्याच्या कडेला असलेला तरुण हे सर्व दृश्य बघतो आणि वेळ न घालवता तातडीने तिथे जाऊन गटाराचे झाकण व्यवस्थित बसवतो. त्याच दरम्यान तो तरुण जिथे उभा होता, तिथेच एक खांब असतो. तो तरुण तिथून निघून गटाराचे झाकण व्यवस्थित बसवायला म्हणून गेल्यावर लगेच तो खांब खाली पडतो. आता जर तो तरुण ते गटाराचे झाकण बंद करायला गेला नसता, तर त्या तरुणाचा जीव धोक्यात आला असता आणि कदाचित त्याला त्याचा जीव गमवावा लागला असता. पण तो तरुण थोडक्यात बचावला. तसेच या व्हिडीओवरून चांगल्या कर्माचे फळ हे नेहमीच चांगले मिळते, याची आपल्याला प्रचिती दिसून येते.

येथे पहा हा व्हायरल व्हिडिओ: 

Spread Positivity, and it will shine you back

तुम्ही आता नुकताच पाहिलेला हा व्हिडिओ X प्लॅटफॉर्मवर @IM_esha_ नावाच्या अकॉउंटद्वारे पोस्ट केला आहे. या व्हायरल व्हिडिओतील घटना कधी आणि कुठे घडली त्याबद्द्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु तो व्हिडिओ पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते कि, केलेले कोणतेही चांगले कर्म कधीही वाया जात नाही. जर आपण चांगले कर्म केले, तर निश्चितच आपले चांगलेच होईल. 


पुढचे ३० दिवस पैसाच पैसा! 

पैसा खेचण्याचं मशीनच म्हणा ना..!

अबब! सोन्याच्या भावात सर्वात मोठी वाढ

स्टँड-अप इंडिया योजनेचे फायदे

उष्णता वाढतेय काळजी  घ्या !

शेतकऱ्यांच्या फायद्याची सरकारची योजना !

पत्नीनंच अभिनेत्याला पाजलं विष ! धक्कादायक बातमी

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना? अशी करा नोंदणी

पतीला मारताच पत्नी म्हणाली, मलाही मारून टाका, दहशवादी म्हणाला..., हृदय पिळवटून टाकणारा थरार















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जलवायू परिवर्तन (Climate Change) आणि त्याचे वातावरणावर होणारे परिणाम

शेतकऱ्यांच्या फायद्याची सरकारची योजना !