जलवायू परिवर्तन (Climate Change) आणि त्याचे वातावरणावर होणारे परिणाम
हवामान बदल (Climate Change) म्हणजे काय? एखाद्या ठराविक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेली ऊन, वारा, पाऊस, थंडी, यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानात जो बदल घडून येतो त्यालाच हवामान बदल म्हणजेच (Climate Change) होय. जलवायू परिवर्तन:- Climate Change जलवायू परिवर्तन जल(पाणी) व वायू(हवा) ह्यांमधे होणार बदल आहे. ह्यामध्ये होणाऱ्या परिवर्तनास या अगोदरची दशक कारणीभूत आहेत. तसेच आताच्या काही वर्षांमध्ये वातावरणात होणार प्रदूषण व मानवीय गतिविधी कारणीभूत आहेत. आणि ह्या गतिविधींनी वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रभाव टाकला आहे. व त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचं तापमानात वाढ होतेय आणि या Climate Change म्हणजेच हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत. जर याविषयी वेळीच पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल. पक्षी-प्राण्याच्या अनेक जाती नष्ट होणे, समुद्राची पातळी वाढणे, भयानक दुष्काळ अशा घटना घडून येतील. वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डाय ऑक्साईड (CO2) उत्सर्जनाचं प्रमाण वा...