जलवायू परिवर्तन (Climate Change) आणि त्याचे वातावरणावर होणारे परिणाम




हवामान बदल (Climate Change) म्हणजे काय?

एखाद्या ठराविक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेली ऊन, वारा, पाऊस, थंडी, यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानात जो बदल घडून येतो त्यालाच हवामान बदल म्हणजेच (Climate Change) होय.

जलवायू परिवर्तन:-  Climate Change

जलवायू परिवर्तन जल(पाणी) व वायू(हवा) ह्यांमधे होणार बदल आहे. ह्यामध्ये होणाऱ्या परिवर्तनास या अगोदरची दशक कारणीभूत आहेत. तसेच आताच्या काही वर्षांमध्ये वातावरणात होणार प्रदूषण व मानवीय गतिविधी कारणीभूत आहेत. आणि ह्या गतिविधींनी वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रभाव टाकला आहे. व त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे.

माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचं तापमानात वाढ होतेय आणि या Climate Change म्हणजेच हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत. 

जर याविषयी वेळीच पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल. पक्षी-प्राण्याच्या अनेक जाती नष्ट होणे, समुद्राची पातळी वाढणे, भयानक दुष्काळ अशा घटना घडून येतील. वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डाय ऑक्साईड (CO2) उत्सर्जनाचं प्रमाण वाढलं असून, परिणामी तापमानातही वाढ झाली आहे. 

मनुष्याद्वारे घरी, फॅक्टरी आणि वाहतुकीसाठी केला जाणाऱ्या तेल, गॅस आणि कोळशाच्या वापरामुळे हवामानात झपाट्याने बदल होत आहेत.

जैवइंधन ज्यावेळी जाळलं जात, त्यावेळी त्यातून ग्रीन हाऊस गॅसेस उसर्जित होतात. यात कार्बन डाय ऑक्साईड (CO2)चं प्रमाण जास्त आहे. या वायूंमुळे सूर्याकडून आलेली उष्णता अडकून राहते आणि त्यामुळे पृथीवरील तापमानात वाढ होत राहते.

हवामान बदलामुळे आपली मानवाची जीवनशैली बदलू शकते. सुपीक जमिनीचं रेताड जमिनीत रूपांतर होईल. पाण्याच्या कमतरतेमुळे पीक उगवण देखील कधीं होईल. 

समुदायाच्या पातळीमध्ये होत असलेल्या वाढीमुळं काही भागात प्रचंड उष्णता वाढेल आणि ते ठिकाण निवास करण्यास योग्य राहणार नाहीत. 

जलवायू परिवर्तनामुळे :- 

सूर्यापासून उत्सर्जित होणारी ऊर्जा पृथ्वीवर पोहचते. हवा आणि समुद्रीवाऱ्यांमुळे ती वातावरणात वेगवेगळ्या भागांमध्ये पुढे जाते. हे जलवायू परिवर्तनाचे एक प्रमुख कारण आहे. तसेच आजच्या नवयुगात मशनरींच्या जास्त वापरामुळे पृथ्वीवर कार्बन उत्सर्जनाचा दर वाढतच आहे. आणि ते वातावरणाला विपरीत पद्धतीने प्रभावित करत आहेत.

१९ व्या शतकाच्या तुलनेत आता जगभरातील तापमानात १.२ सेल्सिअसने वाढ झाली आहे. तर वातावरणातल्या कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढलं आहे.

हवामान बदलाचे विपरीत परिणाम होणं टाळायचं असेल तर तापमानात होणारी वाढ रोखणं गरजेचं असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटल आहे. २१०० पर्यंत ग्लोबल वार्मिंगचे प्रमाण १.५ सेल्शियसपर्यंत रोखणं गरजेचं आहे.

पण जर वेळीच पावलं उचलली नाहीत तर या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीचं तापमान २ अंशांनी वाढण्याची भीती आहे. 

जर आपण काहीही केलं नाही तर पृथ्वीचं तापमान ४ सेल्सिअसने वाढेल आणि परिमाणी विनाशकारी उष्णतेची लाट येईल, समुद्राची पातळी वाढल्याने लाखो लोकांची घर जातील आणि पृथ्वी ग्रहाच आणि यावरील असलेल्या जैवसृष्टीच कधीच भरून न येणार नुकसान होईल. 

जलवायू परिवर्तनाचे प्रभाव:- 

जलवायुच्या व्यापक परिवर्तनामुळे खूप प्रकारची झाडे आणि  पशु - पक्ष्यांची जनसंख्या विलुप्त झाली आहे.तसेच बऱ्याच प्रजातींची जनसंख्या विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. जलवायू परिवर्तनामुळे पर्यावरणाचे असंतुलन वाढत आहे. 

निष्कर्ष:- 

जलवायू परिवर्तन सर्वांनी गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. वातावरण प्रभावित करणाऱ्या मानवीय गतिविधी ज्यामुळे वातावरण खराब होत आहे, त्यावर नियंत्रण करणे महत्वपूर्ण आहे. सरकारबरोबर आपणही जलवायू परिवर्तन थांबवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 


उष्णता वाढतेय काळजी  घ्या !

पैसा खेचण्याचं मशीनच म्हणा ना..!

स्टँड-अप इंडिया योजनेचे फायदे 

अबब! सोन्याच्या भावात सर्वात मोठी वाढ

शेतकऱ्यांच्या फायद्याची सरकारची योजना !

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना? अशी करा नोंदणी

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! या तारखेला जमा होणार एप्रिलचे १५०० रुपये

पतीला मारताच पत्नी म्हणाली, मलाही मारून टाका, दहशवादी म्हणाला..., हृदय पिळवटून टाकणारा थरार















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची सरकारची योजना !

काळ आला होता, पण...!