स्टँड-अप इंडिया योजनेचे फायदे





स्टँड-अप इंडिया योजना

स्टँड-अप इंडिया योजना ही भारत सरकारची एक उपयुक्त अशी योजना आहे. जी अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला उद्योजकांना आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी आहे. ह्या योजनेचा मुख्य उद्देश्य ह्या सर्व जणांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देऊन प्रगत करणे हा आहे. ह्या योजनेतून बँका ग्रीनफिल्ड (नवीन) उद्योगांसाठी SC, ST आणि महिला उद्योजकांना 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकतात.

योजनेचे मुख्य उद्दिष्ट्ये:

उद्योजकतेला प्रोत्साहन:

महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या सर्व समुदायाच्या उद्योजकांना व्यवसाय सुरु करण्यास मदत करणे.

आर्थिक सहाय्य:

ग्रीनफिल्ड उद्योगांसाठी नवीन उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देणे.

रोजगार निर्मिती:

नवीन उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे.

योजनेची वैशिष्ट्ये:

कर्ज मर्यादा: 10 लाख ते 1 कोटी रुपये.
पात्रता: SC, ST आणि महिला उद्योजक (18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे).
कर्जाचे स्वरूप: ग्रीनफिल्ड प्रकल्पांसाठी (नवीन व्यवसाय).
व्याजदर: बदलू शकणाऱ्या व्याजदरांवर अवलंबून.
पैसे परत करण्याची मुदत: 7 वर्षांपर्यंत.
हमी: क्रेडिट गॅरंटी फंड योजनेद्वारे (CGFSIL).

योजनेचे फायदे:

आर्थिक मदत:

उद्योजकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देणे.

उत्पादन, सेवा, व्यापार क्षेत्र आणि शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुरू करणे:

विविध क्षेत्रांमध्ये नवं-नवीन व्यवसाय सुरू करता येतात.

रोजगार निर्मिती:

उद्योगांमुळे नवीन रोजगाराच्या संधी उद्योजकांना निर्माण होतात.

सामाजिक आणि आर्थिक समानता:

महिला आणि SC/ST समुदायातील उद्योजकांना समान संधी मिळतात.

आत्मनिर्भर भारत:

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत उद्योजकांना नवीन उद्योग सुरु करण्यास मदत करणे.

कसे अर्ज करावा:

1. पात्रता:

योजना आणि कर्ज घेण्यासाठी पात्र असल्यास, आपण आपल्या बँकेच्या शाखेत संपर्क साधावा.

2. अर्ज:

आवश्यक कागदपत्रे आणि माहिती भरून अर्ज करावा.

3. मंजुरी:

अर्ज तपासल्यानंतर कर्जाला मंजुरी मिळेल.

4. कर्ज:

मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम आपल्या खात्यात जमा होईल
.

निष्कर्ष:

स्टँड-अप इंडिया योजना महिला आणि SC/ST समुदायाच्या उद्योजकांना सक्षम करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेकजण स्वतःचे नवीन व्यवसाय सुरू करू शकतात आणि रोजगाराच्या नवीन संधी मिळवू शकतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जलवायू परिवर्तन (Climate Change) आणि त्याचे वातावरणावर होणारे परिणाम

शेतकऱ्यांच्या फायद्याची सरकारची योजना !

काळ आला होता, पण...!