स्टँड-अप इंडिया योजनेचे फायदे
स्टँड-अप इंडिया योजना स्टँड-अप इंडिया योजना ही भारत सरकारची एक उपयुक्त अशी योजना आहे. जी अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला उद्योजकांना आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी आहे. ह्या योजनेचा मुख्य उद्देश्य ह्या सर्व जणांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देऊन प्रगत करणे हा आहे. ह्या योजनेतून बँका ग्रीनफिल्ड (नवीन) उद्योगांसाठी SC, ST आणि महिला उद्योजकांना 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकतात. योजनेचे मुख्य उद्दिष्ट्ये: उद्योजकतेला प्रोत्साहन: महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या सर्व समुदायाच्या उद्योजकांना व्यवसाय सुरु करण्यास मदत करणे. आर्थिक सहाय्य: ग्रीनफिल्ड उद्योगांसाठी नवीन उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देणे. रोजगार निर्मिती: नवीन उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे. योजनेची वैशिष्ट्ये: कर्ज मर्यादा: 10 लाख ते 1 कोटी रुपये. पात्रता: SC, ST आणि महिला उद्योजक (18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे). कर्जाचे स्वरूप: ग्रीनफिल्ड प्रकल्पांसाठी (नवीन व्यवसाय). व्याजदर: बदलू शकणाऱ्या व्याजदरांवर अवलंबून. पैसे परत करण्याची मुदत: 7 वर्षांपर्यंत. हमी: क्रेडिट गॅरंटी फ...