उष्णता वाढतेय काळजी घ्या !
उष्णता वाढतेय काळजी घ्या!
उपाय :
१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.
२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.
४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.
५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.
६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.
७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.
८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.
९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.
११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.
१२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.
१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.
१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.
१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.
१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.
१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.
उष्णतेवर घरगुती उपाय:
1. ताक:
ताक हे शरीराला थंड ठेवण्यासाठी उत्तम मानले जाते. ताकात दही किंवा मध मिसळून सेवन केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
2. नारळ पाणी:
नारळ पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि उष्णतेमुळे होणारा थकवा कमी करते.
3. दही:
दही हे देखील उष्णता कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. दही खाल्ल्याने शरीराचे तापमान कमी होते.
4. काकडी:
काकडीमध्ये 95% पाणी असते, त्यामुळे ती शरीराला थंडावा देते. काकडीचे सेवन केल्याने उष्णतेमुळे होणारा त्रास कमी होतो.
5. कलिंगड:
कलिंगड हे देखील एक थंडावा देणारे फळ आहे. कलिंगड खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि उष्णता कमी होते.
6. बडीशेप:
बडीशेप रात्री पाण्यात भिजवून सकाळी सेवन केल्यास पोटाची उष्णता कमी होते.
7. जिरे:
जिरे पाण्यात भिजवून सेवन केल्यास शरीरातील उष्णता कमी होते.
8. सब्जा:
सब्जा रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास पोटाची उष्णता कमी होते.
9. थंड आंघोळ:
उन्हाळ्यात थंड आंघोळ केल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णता कमी होते.
10. हलके कपडे:
सैल आणि हलके कपडे घातल्याने शरीराला हवा खेळती राहते आणि उष्णता कमी होते.
या उपायांमुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते आणि उन्हाळ्यातील उष्णतेचा त्रास कमी होतो.
अबब! सोन्याच्या भावात सर्वात मोठी वाढ
पत्नीनंच अभिनेत्याला पाजलं विष ! धक्कादायक बातमी:
जलवायू परिवर्तन (Climate Change) आणि त्याचे वातावरणावर होणारे परिणाम.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा