प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना? अशी करा नोंदणी



प्रधानमंत्री (PMKVY) कौशल्य विकास योजना? अशी करा नोंदणी

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) हि भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांपैकी एक आहे. ह्या योजनेचा उद्देश देशातील तरुणांना उद्योगाशी संबंधित मोफत प्रशिक्षण देणे आहे. ज्यामुळे त्यांना रोजगार मिळण्यास मदत मिळू शकेल.

हि योजना पीएमकेवीवाय कौशल्य विकास व उद्योग मंत्रालयाच्या वतीने चालवली जाते.पीएमकेवीवाय योजनेत तरुणांना ट्रेनिंग देण्याची फी सरकार भरते. सरकार PMKVY च्या माध्यमातून कमी शिकलेले किंवा 10वी, 12वी (मध्येच शाळा सोडणारे) युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देते. 


योजनेचे फायदे:  

प्रशिक्षण: 

योजनेच्या अंतर्गत तरुणांना वेगवेगळ्या उद्योगांसंबंधित मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते.

कौशल्य प्रमाण:

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणांना कौशल्य प्रमाणपत्र दिले जाते. 

रोजगार: 

योजनेतून तरुणांना वेगवेगळ्या उद्योगांमध्ये रोजगार मिळण्यास मदत केली जाते. 

कौशल्य विकास:

योजनेतून तरुणांचे कौशल्य विकसित केले जाते व त्यांना रोजगाराप्रती तयार केले जाते. 

आत्मनिर्भर:

योजनेतून तरुणांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत केली जाते. 

रजिस्ट्रेशन कसे कराल?

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) मध्ये अर्जदारास आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी http://pmkvyofficial.org या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले नाव, पत्ता व ईमेल आदि माहिती भरावी लागेल.

योजनेसाठी फार्म भरल्यानंतर अर्जदारास ज्या तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण हवे आहे, ते क्षेत्र निवडावे लागेल. PMKVY मध्ये कन्सस्ट्रक्शन, इलेक्ट्रॉनिक्स व हार्डवेयर, फूड प्रोसेसिंग, फर्निचर आणि फिटिंग, हँडीक्रॉफ्ट, जेम्स आणि ज्वेलरी आणि लेदर टेक्नोलॉजी सारख्या जवळपास 40 वेगवेगळ्या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते.

PMKVY मध्ये आपल्या आवडीचे क्षेत्र निवडल्यानंतर एक अतिरिक्त तांत्रिक क्षेत्राची निवड करावी लागेल. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला आपले प्रशिक्षण केंद्र निवडावे लागेल.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या (PMKVY) विशेष गोष्टी?

प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) साठी कोणतीही फी द्यावी लागत नाही. उलट प्रोत्साहन म्हणून सुमारे 8000 रुपये सरकार बेरोजगार तरुणांना देते.

पीएमकेवीवायमध्ये 3 महिने, 6 महिने आणि 1 वर्षाच्या प्रशिक्षणासाठी रजिस्ट्रेशन केले जाते. कोर्स पूर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेट दिले जाते. हे सर्टिफिकेट संपूर्ण देशात मान्य असते.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) मध्ये ट्रेनिंग यशस्वी पूर्ण केल्यानंतर सरकार आर्थिक सहायता करण्यासोबतच नोकरी देण्यासाठीही मदत करते. रोजगार मेळावे आयोजित करून सरकार अशा प्रशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करते.

पीएमकेवीवाय योजनेचा उद्देश्य अशा लोकांना रोजगार उपलब्ध करणे आहे, जे कमी शिकलेले आहेत किंवा असे तरुण ज्यांशी शालेय शिक्षण अर्ध्यातूनच सोडले आहे.


पुढचे ३० दिवस पैसाच पैसा! 

अबब! सोन्याच्या भावात सर्वात मोठी वाढ

स्टँड-अप इंडिया योजनेचे फायदे

पत्नीनंच अभिनेत्याला पाजलं विष ! धक्कादायक बातमी

जलवायू परिवर्तन (Climate Change) आणि त्याचे वातावरणावर होणारे परिणाम 

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जलवायू परिवर्तन (Climate Change) आणि त्याचे वातावरणावर होणारे परिणाम

शेतकऱ्यांच्या फायद्याची सरकारची योजना !

काळ आला होता, पण...!