लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! या तारखेला जमा होणार एप्रिलचे १५०० रुपये



Ladki Bahin Yojana April Installment: लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? निकष बदलले का? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती!

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना एप्रिल महिन्याच्या  हप्त्याची प्रतीक्षा आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्याच्या घडीला राज्यात २ कोटी ४७ लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत. जुलैपासून नऊ  हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. एप्रिलचा दहावा हप्ता असून हा महिना संपत आला असून या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. 

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana April Installment Updates: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा येणार याकडे सर्व पात्र महिलांचे लक्ष लागलेले आहे. या योजनेचे पैसे खात्यात जमा झालेत कि नाही हे तपासण्याकरिता अनेक महिला बँकेत रांगाही लावत आहेत. मात्र, एप्रिल महिन्याचे पैसे अद्यापही सरकारकडून देण्यात आलेले नसून यासंदर्भात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्या आज माध्यमांशी बोलत होत्या. तसंच यावेळी त्यांनी या योजनेच्या निकषांसंदर्भात माहिती दिली. 

जुलै महिन्यापासून राज्यात मुखमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अडीच लाखांचे उत्पन्न असलेल्या महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. या योजनेकरिता इतर अनेक निकषही शासननिर्णयानुसार लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार सध्याच्या घडीला राज्यात २ कोटी ४७ लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत. जुलैपासून नऊ हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. एप्रिलचा दहावा हप्ता असून हा महिना संपत आला असून तरीही या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे सातत्याने सरकारला प्रश्न विचारला जात आहे. 

योजनेसाठी अर्ज प्रकिया गेल्या वर्षीच थांबली असल्याने, त्यानंतर पात्र ठरलेल्या किंवा वयाची अट पूर्ण केलेल्या महिला लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २८ जून २०२४ रोजी या योजनेची घोषणा झाल्यानंतर, १ जुलै ते ३० जुलै २०२४ या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. तसेच प्राथमिक छाननीनुसार, निकषांमध्ये बसत नसल्याने यापैकी १३ लाखांहून अधिक महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले. 

सध्या, २.४७ कोटी महिला योजनेच्या लाभार्थी असल्याचे सांगितले जात आहे या योजनेसाठी १ जानेवारी २०२४ रोजी २१ वर्ष पूर्ण केलेल्या महिला पात्र होत्या. मात्र, अनेक महिलांनी या तारखेनंतर वयाची अट पूर्ण केली किंवा इतर निकषांमुळे त्या नंतर पात्र ठरल्या आहेत. परंतु सध्या योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रकिया बंद आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२४ नंतर २१ वर्ष पूर्ण केलेल्या किंवा इतर कारणामुळे नव्याने पात्र ठरलेल्या महिला अर्ज करू शकत नाहीत. या महिलांना योजनेत कसे समाविष्ट केले जाईल आणि त्यांना लाभ कधीपासून मिळेल. याबाबत शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा मार्गदर्शक सूचना करण्यात आलेली नाही. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनीही याबाबत दुजोरा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'योजनेची अंमलबजावणी कधीपासून करायची, याचा शासन निर्णय अद्याप प्रलंबित आहे. तो प्राप्त झाल्यावर आणि त्याचा आढावा घेतल्यानंतरच अंमलबजावणीच्या तारखेबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.' त्यामुळे योजनेसाठी ३६,००० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली असली तरी, प्रत्यक्ष लाभ वितरणाला आणि नवीन पात्र महिलांच्या समावेशाला अजून अवधी लागण्याची चिन्हे आहेत. 

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

आज माध्यमांशी संवाद साधताना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, "एप्रिल महिना संपण्याच्या आधी पात्र महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरित केला जाणार आहे." दरम्यान, आदिती तटकरे यांनी यासंदर्भात कोणतीही थेट तारीख दिली नसून आता महिना संपण्यास अवघे ७ दिवस उरलेले असताना सरकारकडून पात्र महिलांना हे पैसे कधी मिळणार याबाबत चर्चेला जोर आला आहे. काही वृत्तांनुसार, अक्षय तृतीयेला हा निधी वितरित केला जाणार आहे. ३० एप्रिलला अक्षय तृतीया आहे. त्यामुळे पात्र महिलांना ३० एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. 


पुढचे ३० दिवस पैसाच पैसा! 

पैसा खेचण्याचं मशीनच म्हणा ना..!

अबब! सोन्याच्या भावात सर्वात मोठी वाढ

स्टँड-अप इंडिया योजनेचे फायदे

उष्णता वाढतेय काळजी  घ्या !

शेतकऱ्यांच्या फायद्याची सरकारची योजना !

पत्नीनंच अभिनेत्याला पाजलं विष ! धक्कादायक बातमी

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना? अशी करा नोंदणी

पतीला मारताच पत्नी म्हणाली, मलाही मारून टाका, दहशवादी म्हणाला..., हृदय पिळवटून टाकणारा थरार








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जलवायू परिवर्तन (Climate Change) आणि त्याचे वातावरणावर होणारे परिणाम

शेतकऱ्यांच्या फायद्याची सरकारची योजना !

काळ आला होता, पण...!